Sunday, April 14, 2013

“एका नदीला वाचवण्यासाठी आर्थिक मदतीचे जाहिर 

आवाहन”


कारंजा तालुक्यातील बेंबळा नदीचे पाणलोट क्षेत्र 



भारतातल्या नद्या ह्या जीवनदायीनी नद्या असून लाखो कुटूंबींयांना आधार प्रदाण करणा-या नैसर्गिक व्यवस्था आहेत. अशाच एका विदर्भातल्या शुष्क, शेतक-यांच्या आत्महत्येने गाजलेल्या वाशिम जिल्ह्यातून बेंबळा नावाची नदी वाहत जाऊन वर्धा नदीला मिळते. ही नदी अनेक प्रश्नांनी सद्या कठीण अवस्थेमध्ये आहे. नदीत प्रचंड गाळ साचल्याने नदीतले पुरातन डोह बुजले आहेत त्यामुळे नदीच्या खो-यातील विहरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे, नदीमुळे होणारे सिंचन अगदी कमी झाल्याने इथला गरीब शेतकरी विपन्नावस्थेत आहे, नदीतले मासे संपत चालल्याने इथला मासेमारीवर अवलंबून असणारा समाज देशोधडीला लागला आहे आणि एकुणच जैविक चक्रात मोठी खिळ निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत या खो-यातील जनतेने एकत्र येऊन या नदीला नवसंजीवनी देण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने पावसाळ्याच्या आधी खालील गोष्टी प्राधान्याने करायच्या आहेत ज्या साठी आपल्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे.
1.    “बेंबळा नदी वाचवा जीवन वाचवा” या लोकसहभागाच्या अभीयानाची सुरुवात.
2.    नदीच्या खो-यामध्ये जल व मृदा संधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु करणे जेणे करुन नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असलेली माती थांबवल्या जाईल.
3.    नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काही प्रमाणात का होईना काढून टाकणे.
4.    ह्या गाळामूळे नदीच्या पात्रात वाढत चाललेली काटेरी झुडपे काढून टाकणे.
5.    नदीचे पारंपरिक डोहामधील गाळ काढणे जेणे करुन त्यामधील झरे मोकळे होतील व पाण्याचा साठा वाढेल.
6.    नदीला येऊन मिळणा-या छोट्या नाल्यांवर छोटे छोटे बंधारे बांधणे जेणे करुन या विभागातली भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल.
जर उपरोक्त कामे केली गेली तर
1.    या विभागातली पिण्याच्या, सिंचनाच्या व जनावरांच्या पाण्याची समस्या पूर्णता: निकालात निघेल.
2.    या कामामुळे केवळ वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातीलच ७३ गावांना फायदा होईल.
3.    या कामामुळे शेकडो मासेमारांच्या कुटूंबियांना फार मोठा आधार प्राप्त होईल.
4.    आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक नदी वाचल्यामुळे एकुणच निसर्गाचा ढासळत चाललेला तोल सांभाळला जाईल.
तेव्हा आपल्याला आवाहन केल्या जात आहे की आपण या अतिषय महत्त्वाच्या कार्याला आर्थिक मदत करावी. आपल्या प्रत्येक पैशाचा अतिषय पारदर्शक पद्धतीने नदी संवर्धनाच्या कार्यासाठी उपयोग केल्या जाईल तसेच वेळोवेळी ह्या सर्व प्रकल्पाचा हिशोब आपल्या समोर सादर केल्या जाईल.
·         आपले चेक/डि.डी. “संवर्धन समाज विकास संस्था” कारंजा या नावे पाठऊ शकता. बॅंकेचे नाव: स्टेट बॅंक आफ इंडीया, शाखा कारंजा लाड, अकोला. ब्रांच क्रमांक: ०४०४
·         आन लाईन डिपाजीट करिता “संवर्धन समाज विकास संस्था” च्या खात्यात ट्रांसफर करु शकता. खाते क्रमांक: 30368705158

(सद्या एफसिआरए मध्ये संस्था पंजीबद्ध न झाल्यामुळे परदेशी देणगी स्विकारु शकत नाही)

अधिक माहिती साठी या अभीयानाची वेबसाईट www.samvardhan.org.in वर log in करा

सढळ हस्ते ह्या महान कार्यास मदत करुन उज्वल भविष्यासाठी हातभार लावा.

आपले विनीत
“बेंबळा बचाओ कृती समीती व संवर्धन”
c/o डा. निलेश हेडा
शेतकरी निवास जवळ, वाशिम रोड, कारंजा लाड
जिल्हा वाशिम ४४४१०५ (महाराष्ट्र)